स्थूल अर्थशास्त्र
स्थूल अर्थशास्त्राचा परिचय | प्रस्तावना : स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत Makro Economics असे म्हणतात Makro शब्दापासून Macro हा इंग्रजीत प्रति शब्द तयार झाला त्याला मराठीत स्थूल / समग्र असे म्हणतात . या स्थूल अर्थशास्त्रात एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो . म्हणजेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास न करता सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो . स्थूल अर्थशास्त्राचा संबंध अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी , एकूण पुरवठा , एकूण राष्ट्रीय उत्पन्न , एकूण बचत , एकूण गुंतवणूक , एकूण उत्पादन , एकूण उपभोग इत्यादीशी येतो . अर्थव्यवस्थेतील एका विशिष्ट कारखान्यातील कामगारांच्या वेतनाची चर्चा विशिष्ट बचती ऐवजी एकूण बचतीचा विचार विशिष्ट उत्पादना ऐवजी एकूण उत्पादनाचा विचार आपण स्थूल अर्थशास्त्रात करतो . थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र राष्ट्राला उपयुक्त ठरते . अशा तत्वांची व धोरणाची चर्चा करते . स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या :- [ Definition of macro economics ] ...