स्थूल अर्थशास्त्र
- Get link
- X
- Other Apps
स्थूल अर्थशास्त्राचा परिचय |
प्रस्तावना :
स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत Makro Economics असे म्हणतात Makro शब्दापासून Macro हा इंग्रजीत प्रति शब्द तयार झाला त्याला मराठीत स्थूल / समग्र असे म्हणतात . या स्थूल अर्थशास्त्रात एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो . म्हणजेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास न करता सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो . स्थूल अर्थशास्त्राचा संबंध अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी , एकूण पुरवठा , एकूण राष्ट्रीय उत्पन्न , एकूण बचत , एकूण गुंतवणूक , एकूण उत्पादन , एकूण उपभोग इत्यादीशी येतो . अर्थव्यवस्थेतील एका विशिष्ट कारखान्यातील कामगारांच्या वेतनाची चर्चा विशिष्ट बचती ऐवजी एकूण बचतीचा विचार विशिष्ट उत्पादना ऐवजी एकूण उत्पादनाचा विचार आपण स्थूल अर्थशास्त्रात करतो . थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र राष्ट्राला उपयुक्त ठरते . अशा तत्वांची व धोरणाची चर्चा करते .
स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या :- [ Definition of macro economics ]
अनेक अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्रांच्या व्याख्या दिल्या आहेत . त्यातील काही व्याख्या पुढीलप्रमाणे :-
1] प्रा . जे . एल . हॅन्सेन :-
" एकूण रोजगार , एकूण बचत , एकूण भांडवल गुंतवणूक आणि राष्ट्रीय उत्पन्न या सारख्या मोठया समुच्चयातील संबंधाचा विचार करणारी अर्थशास्त्रांची शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय " .
2] प्रा . कार्ल शॅपिरो :-
" स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे " .
Scope Of Macro Economics |
स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती :- [ scope of Macro economics ]
समग्रलक्षी अध्ययन पद्धती ज्या दृष्टीकोनातून उपयोगाची ठरते . आणि ज्या बाबीसाठी अशा अध्ययन पद्धतीचा वापार होतो . त्यावरून समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती लक्षात येते .
1] रोजगार व उत्पादन सिद्धांत :- [ Employment & production theory ]
लॉर्ड केन्स यांनी रोजगार व उत्पादना संदर्भात जो सिद्धांत मांडला तेव्हा पासून रोजगार व उत्पादन पातळी योग्य समतोल ठेवण्यासाठी कोणते प्रयन्त केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे प्रा .लिप्से यांनी अर्थव्यवस्थेतील साधन संपत्तीची स्थिती लक्षात घेऊन साधन संपत्ती बेकार राहणार नाही . अशा प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे तेव्हा उत्पादन व रोजगाराची व्याप्ती साध्य करता येते थोडक्यात समग्र अर्थशास्त्राच्या माध्यमातून रोजगार पातळी अशी गाठली जाते . या विषयी लिप्से यांनी मार्गदर्शन केले आहे .
2] उपभोग व गुंतवणूक सिद्धांत :- [consumption & investment theory ]
अर्थव्यवस्थेत व्यक्ती , संस्था व सरकार उपभोग वस्तू व भांडवली वस्तू यावर खर्च करीत असतात . भविष्यकालीन उपभोग तरतूद वर्तमानकालीन गुंतवणूकीतून केली जात असते . थोडक्यात उपभोगाची आणि गुंतवणूकीची पातळी व्यक्ती , संस्था , सरकार व विदेशी नागरीक यांच्या परस्पर संबंधावर आधारित असते . शक्यतो देशपातळीवर उपभोगाची व गुंतवणूकीची पातळी अपेक्षेप्रमाणे प्रस्थापित झाली पाहिजे अशा आर्थिक विश्लेषणाचा उद्देश असतो . त्यातुनच उपभोग व गुंतवणूक सिद्धांत आकारास आले आहे .
3] व्यापार चक्रविषयक सिद्धांत :- [ Theory of business cycles ]
व्यापार चक्रां संदर्भात खऱ्या अर्थाने 1929 च्या मंदीनंतर कमालीची जागृता आली . श्यूंपिटर यांनी व्यापारचक्र संदर्भात विशेष अभ्यास करून व्यापार चक्र विरोधी उपाययोजना येतील या संदर्भात मार्गदर्शन केले आहे . व्यापार चक्रीय व्यापकता आकार कसा मर्यादित करता येईल . याचे मार्गदर्शन केले आहे . जगातील अर्थव्यवस्थेमध्ये . व्यापार चक्रीय बदल होत असतात . तेजी , घसरण , मंदी , पुनर्जीवन या अवस्था व त्यांचे परिणाम या विषयी व्यापार चक्र सिद्धांत स्पष्टीकरण करतो .
4] सर्व सामान्य किंमत पातळी सिद्धांत :- [ All Common Price level theory ]
प्रत्येक देशात सर्व सामान्य किंमत पातळी कशी प्रस्थापित होते . तिच्यातील चढ - उताराचे काय परिणाम होतात . चलनवाढ व चलन संकोच या स्थितीचे काय परिणाम होतात. ते परिणाम कसे दुर करावे . या संदर्भात सिद्धांतात विचार केला आहे .
5] आर्थिक अभिवृद्धी :- [ Economic growth ]
प्रत्येक अर्थव्यवस्थेचा भविष्य उज्वल असावा या विषयी प्रयत्न करत असते . भविष्यकाळात उत्पादन , रोजगार , निर्यात , उच्च राहणीमान , उच्च बौद्धीक सुख या विषयी मार्गदर्शन करीत असते यातूनच आर्थिक वृद्धीचे उद्दीष्ट्ये साध्य होते . विकसनशील व गरीब राष्ट्र आपल्या समस्या कशा सोडवू शकतील या विषयी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपली प्रतिमाने सादर करून विश्लेषन केलेले आहे . थोडक्यात आर्थिक वृद्धी विषयी गरिब व श्रीमंत राष्ट्र अधिक सतर्क आहे .
6] विभाजनाचा सिद्धांत :- [ The Principle of division ]
प्रत्येक देशांत राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी कशी होती . उत्पन्न वाटणीत फेरबदल कसे होतात . देशातील दारिद्रय निर्मुलन कसे करावे . मागास जातीचा विकास कसा करावा. कराच्या माध्यमातून मिळालेला पैसा सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून कसा वापरावा. कराच्या बाबतीत न्याय दृष्टीकोन कसा असावा. या संदर्भात अनेक अर्थतज्ञांनी मार्गदर्शन केले आहे . थोडक्यात समग्र अर्थव्यवस्था काही उद्दीष्ट्ये समोर ठेवून या शब्दाचा कसा उपयोग करता येईल. यावरून समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती लक्षात येते .
महत्वाचे प्रश्नउत्तर :-
1. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विकासाचे श्रेय कोणाला दिले जाते ?
उत्तर: केन्स
2. समग्रलक्षी अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची अशी एक शाखा आहे की जी एका विशिष्ट घटकांचा अभ्यास न करता सर्व घटकांचा--------अभ्यास करते ?
उत्तर: एकत्रितरीत्या
3. समग्रलक्षी अर्थशास्त्रात कोणत्या अभ्यास घटकाचा अभ्यास केला जातो ?
उत्तर: आर्थिक वृद्धी
4. दोन देशातील चलनाची ज्या दराने देवाण-घेवाण होते त्या कोणते दर म्हणतात ?
उत्तर: विनिमय
5. स्थूल अर्थशास्त्रात कोणत्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो ?
उत्तर: व्यापारचक्र
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment